TheKapilSharmaShow: हिंदी मनोरंजनविश्वात नेहमी चर्चेत राहणारा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. शोच्या दुसऱ्या सीझनचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, जवळपास ७ वर्षांनंतर अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक एकत्र मंचावर दिसणार आहेत.
प्रोमोमधील गोविंदा(Govinda) आणि कृष्णाच्या खास क्षणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांना मामा-भाच्यामधील वाद मिटल्याचा अंदाज आहे. शोच्या सेटवर गोविंदाने कृष्णाला मिठी मारल्याचं दृश्य सोशल मीडियावर खूप गाजत आहे. कृष्णा अभिषेकने गोविंदाला मिठी मारत हसत म्हटलं, “आपण खूप दिवसांनी असे भेटलो आहोत, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही.”
त्यानंतर कृष्णाने गोविंदाचं कौतुक करत त्याला ‘हिरो नं-१’, ‘कुली नं-१’ आणि ‘मामा नं-१’ म्हणत मामा-भाच्याचा अंदाज दाखवला. गोविंदाने त्याला गमतीने विचारलं, “‘मामा नं-१’ म्हणजे मला हलक्यात घेऊन मामा बनवतोस का?” या संवादावर सेटवरील सर्वजण हसून लोटपोट झाले.
या प्रोमोमध्ये कृष्णाच्या बहिणीची, आरती सिंहची झलकही दिसून येते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. या एपिसोडमध्ये गोविंदासोबत शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांचाही समावेश असणार आहे, ज्यामुळे हास्याचा डोस दुपटीने वाढणार आहे.(Kapil Sharma)
कृष्णा-गोविंदाच्या वादावर पडदा?
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक(Krushna Abhishek) यांच्यातील वाद बऱ्याच काळापासून चर्चेत होते. मात्र, या शोच्या माध्यमातून त्यांचा मतभेद मिटल्याचा संकेत मिळत आहे. हा भाग प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरेल यात शंका नाही.(Comedy Show)
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा हा धमाकेदार भाग कधी प्रक्षेपित होणार?
Bollywood News सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, ज्यामध्ये मामा-भाचा आणि इतर कलाकार हास्याचा फुलटू डोस देणार आहेत.(Entertainment News)
- टेस्ला शोरूम उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल – “२५ लाखांची कार ६० लाखांना, जबाबदार कोण?”
- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल लांबला
- TAIT 2025 परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना: व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिध्दीपत्रक
- Vivo X200 FE भारतात लॉन्च: डायरेक्ट अॅपलसोबत स्पर्धा? Samsung आणि गुगलने ही घेतला धसका
- TAIT 2025 परीक्षा : B.Ed Appeared उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना, गुणपत्रक पाठवण्यास…