रिल्स बनवण्याच्या नादात तरुण पडला थेट पाण्यात | व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियाच्या युगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. मजेशीर व्हिडिओ किंवा अचानक घडलेले काही प्रसंग कॅमेऱ्यात कैद होऊन चटकन लोकांच्या चर्चेचा विषय बनतात. सध्या असाच एक गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाचा रिल्स बनवण्याचा नाद थेट पाण्यात पडून संपतो.

बोटीवर रिल्स करताना झाला गोंधळ


व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण बोटीवर उभा राहून रिल्स बनवत होता. कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याच्या नादात तो मागे चालत होता. मात्र, बोटीवर मागे पाहून चालताना त्याचा तोल गेला आणि तो थेट पाण्यात पडला. त्याचा मित्र दूरून त्याचा व्हिडिओ शूट करत होता, त्यामुळे ही मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील रांची एक्सप्लोरर्स या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून त्याला ‘इसकी कसती ही वहां डूबी जहां पानी कम था’ असा मजेदार कॅप्शन देण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि २५ हजारांपेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत.



नेटकऱ्यांचा प्रतिक्रियांचा वर्षाव


व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया देताना गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘नजर हटी दुर्घटना घटी’ तर दुसऱ्याने विचारले, ‘रिल्स बन गई कि नही?’ अशी वेगवेगळी मजेशीर प्रतिक्रियांनी व्हिडिओ अधिकच चर्चेत आला आहे.

टीप:
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सत्यता पडताळलेली नाही. वाचक-प्रेक्षकांसाठी ही माहिती केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने देण्यात येत आहे.

Leave a Comment