बिहारच्या लोकगायिका शारदा सिन्हा गंभीर आजाराशी झुंजत; चाहत्यांची प्रार्थना

लोकप्रिय लोकगायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती गंभीर असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत. ७२ वर्षीय सिन्हा गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असून, त्यांच्या छठ गीतांनी त्यांना बिहारच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनवले आहे.