पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाची चिन्हं? ‘टपका रे टपका’ गाण्यावरून खुनाचा संकेत, आंदेकर-कोमकर वादाचा नवा अध्याय

1000220310

पुण्यात नाना पेठ परिसरात आंदेकर-कोमकर टोळीयुद्धाची नवीन मालिका सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत. ‘टपका रे टपका’ गाणं डीजेवर लावून हत्येचा संकेत देत आंदेकर यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सहा पथके तैनात केली असून, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.