Prada वादानंतर कोल्हापुरी चपलांची जागतिक ओळख मजबूत; 10,000 कोटींच्या निर्यातीची शक्यता – मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही
Prada च्या वादामुळे कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या पारंपरिक उत्पादनातून 10,000 कोटी रुपयांची निर्यात क्षमता असल्याचे सांगत भारताच्या बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.