खोट्या कागदपत्रांवरून निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांची आयात; डीआरआयचा मोठा छापा
डीआरआयने न्हावा शेवा बंदरावर मोठी कारवाई करत बनावट कागदपत्रांद्वारे चीनमधून आलेल्या निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांचा ५० कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या खेळण्यांवर केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे.