७ ऑगस्टपासून ‘शाश्वत शेती दिन’; डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना आदरांजली
महाराष्ट्र शासनाने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिनी ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर शेतकरी, विद्यापीठ आणि प्रशासन स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.