तब्बल 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ! मोठा गैरव्यवहार उघड, चौकशीला सुरुवात

महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांना 21.44 कोटींचा आर्थिक लाभ मिळाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. सध्या याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.