💡💡वीज गेल्यावर चिंता नाही! महावितरणकडून व्हॉट्सअॅपद्वारे तात्काळ अपडेट्स 💡💡
जामखेडमध्ये महावितरण कार्यालयाने नागरिकांसाठी व्हॉट्सअॅपद्वारे विजेशी संबंधित अचूक आणि तात्काळ माहिती देणारा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. वीज गेल्यावर कारण, अंदाजित वेळ, देखभाल कामाची पूर्वसूचना यांसारख्या माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभलेला हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो.