पुण्यात पुनीत बालन ग्रुपची डीजेमुक्त दहीहंडी; २३ गणेश मंडळांचा एकत्रित उपक्रम
पुण्यात यंदा पुनीत बालन ग्रुपच्या पुढाकाराने २३ गणेश मंडळांची संयुक्त डीजेमुक्त दहीहंडी साजरी होणार आहे. ढोल-ताशा, प्रभात बँड आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगणारा हा सोहळा १५ ऑगस्ट रोजी लाल महाल चौकात होणार आहे.