लाडकी बहीण योजनेतून महिलांना रक्षाबंधनाची भेट; जुलैचा हफ्ता ९ ऑगस्टपर्यंत खात्यात
रक्षाबंधनपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे