पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; कोयना धरणातून 67,700 क्युसेक्स विसर्ग, कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून तब्बल 67,700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता असून, सांगली-कोल्हापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.