पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे निर्माल्य शेतकऱ्यांसाठी वरदान; जाणून घ्या कसे तयार होते सेंद्रिय खत
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी अर्पण झालेले निर्माल्य आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे युवा यांच्या उपक्रमातून निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार होऊन ते शेतकऱ्यांना विनामूल्य दिले जाते.