मराठा‑ओबीसी संघर्ष: लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर केला थेट हल्लाबोल, आरक्षणाचा संघर्ष तापला
प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या ओबीसी आरक्षणावर होणा-या परिणामावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मनोज जरांगेंवर थेट टीका करत म्हटले—”दहशत दाखवून आरक्षण मिळत नाही” आणि अशी पद्धत ओबीसींच्या अधिकाराला धोकादायक आहे. राज्यात आरक्षण संघर्ष पुन्हा तापताना, लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.