सांगलीतील पवनऊर्जा प्रकल्पातील जमीन व्यवहाराची सखोल चौकशी; महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश
सांगली जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्पासाठी शेतकर्यांपासून खरेदी झालेल्या जमिनींच्या व्यवहारांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘सर्जन रियालिटीज’वर कमाल जमीन धारणा कायदा उल्लंघनाचा आरोप असून, अवैध व्यवहार आढळल्यास जमीन शेतकर्यांना परत करण्याचा सरकारचा निर्धार आहे.