कृष्णा नदीच्या पुरामुळे सांगली अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली; दहनविधीची व्यवस्था कुपवाड स्मशानभूमीत
कृष्णा नदीची पातळी 33 फुटांवर पोहोचल्याने सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दहनविधीसाठी कुपवाड स्मशानभूमीत महानगरपालिकेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.