उद्योगांच्या सर्व परवान्यांसाठी आता ‘मैत्री पोर्टल’ एकच प्रवेशद्वार: मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रातील सर्व उद्योग परवाने, मंजुरी व नोंदणी प्रक्रिया आता ‘मैत्री पोर्टल’वरूनच पार पडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर करत उद्योगांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.