स्वदेशीचा संकल्प: पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आत्मनिर्भरतेचे आवाहन


वाराणसी
जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘स्वदेशी’ चा जोरदार आग्रह केला आहे. वाराणसीमध्ये विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना मोदींनी देशवासियांना स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले.

“आपण आर्थिकदृष्ट्या तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे आपली प्रत्येक कृती ही भारताच्या प्रगतीस पोषक ठरायला हवी. जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे वादळ आहे. अशा वेळी आपण स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे ही खरी देशसेवा ठरेल,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले, “व्यापाऱ्यांनी स्थानिक स्तरावर तयार झालेल्या वस्तू विकण्याची शपथ घ्यावी, तर ग्राहकांनीही खरेदी करताना ती वस्तू भारतात तयार झाली आहे का, याचा विचार करावा.”

त्यांनी अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणावर भाष्य करत सांगितले की, “काही आंतरराष्ट्रीय शक्तींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला मृतवत म्हटले होते, पण आज भारताची गती व प्रगतीच त्यांना उत्तर देत आहे.”



Leave a Comment