सांगलीतील विश्रामबाग परिसरात उद्या पाणीकपात; नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन


सांगली: विश्रामबाग परिसरातील नागरिकांना उद्या, २ ऑगस्ट रोजी, अपुऱ्या पाण्याचा सामना करावा लागणार आहे. हिराबाग प्युअर वॉटर पंप हाउस मधील ७५ एचपी क्षमतेच्या मोटारीच्या डिस्चार्ज हेडमध्ये क्रॅक आल्यामुळे सदरची पंप यंत्रणा तत्काळ बंद करण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाने तत्परतेने पर्यायी उपाययोजना करत सध्या स्टँडबाय स्वरूपातील ७० एचपी क्षमतेचा पंप वापरून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या पंपाच्या डिस्चार्ज क्षमतेत कमतरता असल्यामुळे विश्रामबाग परिसरातील काही भागांमध्ये उद्या कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाणीपुरवठ्यावर परिणाम होणारे भाग:

  • चांदणी चौक
  • गणपती मंदिर परिसर
  • दत्तनगर, धामणी रोड
  • मुलींच्या वसतिगृहाजवळील गणपती मंदिर परिसर
  • शंभूर फुुटी रोड, प्रगती कॉलनी
  • शांतिबन कॉलनी, नागराज कॉलनी इत्यादी

या सर्व भागांना जल भवन व विश्रामबाग येथील टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पंपाची कार्यक्षमता कमी असल्यामुळे पूर्ण दबावाने पाणी पोहोचण्यास अडथळा येणार आहे.

या परिस्थितीत, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, “पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, तसेच प्रशासकीय सहकार्य करावे.”


Leave a Comment