मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली मधील प्रमुख अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेणार आहे. तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवरून ही बातमी समोर आली आहे. रेश्मा शिंदे ही मालिकेत जानकी वहिनीची भूमिका साकारत आहे, जी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
रेश्माच्या ब्रेकचा कारण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठा बदल आहे. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. नुकतेच रंग माझा वेगळा या मालिकेच्या टीमने रेश्मासाठी केळवण केले. तिच्या केळवणाचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले असून, चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
रेश्माचा होणारा जोडीदार अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र चाहत्यांमध्ये या विषयावर मोठी उत्सुकता आहे. लग्नासाठी रेश्मा काही काळ मालिकेतून ब्रेक घेणार असल्याने घरोघरी मातीच्या चुली मधील जानकी वहिनी काही काळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.
रेश्माच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून, तिच्या नव्या प्रवासासाठी प्रेक्षकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अग्रस्थानी असून, रेश्माची अनुपस्थितीही मालिकेच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम करणार नाही, असा विश्वास प्रेक्षकांना आहे.
रेश्मा शिंदेच्या लग्नासाठी तिला खूप खूप शुभेच्छा!
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड