Rashmika Mandanna Relationship: फोटो लीक झाल्यावर रश्मिका मंदान्नाने दिली नात्याची कबुली; लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलं अस उत्तर, पहा व्हिडिओ

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा: अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित पुष्पा 2 चित्रपटात श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना पुन्हा झळकणार आहे. परंतु सध्या रश्मिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याच्या अफवा अनेक दिवसांपासून रंगल्या असून चाहत्यांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.


अलीकडेच विजयने एका मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपबाबत सूचक विधान केले होते. त्याने म्हटले होते, “मी 35 वर्षांचा आहे. तुला वाटतं की मी अजूनही अविवाहित राहीन?” या विधानामुळे चाहत्यांनी विजयच्या खासगी आयुष्यावर चर्चा करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, चेन्नईत पुष्पा 2 चित्रपटाच्या एका गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात रश्मिकाला तिच्या लग्नाबाबत विचारले असता, तिने हसत उत्तर दिले, “प्रत्येकाला याबद्दल माहिती आहे.” या उत्तराने चाहत्यांमध्ये आणखी कुतूहल निर्माण झाले. होस्टने आणखी काही स्पष्टता विचारली असता रश्मिकाने मिश्कीलपणे सांगितले, “आता यावर बोलू नकोस, मी तुला नंतर सांगते.”


रश्मिका आणि विजय यांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली होती, त्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. सध्या दोघेही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगून आहेत, मात्र त्यांचं एकत्र दिसणं, आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडिओंमुळे चाहत्यांमध्ये लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

रश्मिका सध्या पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, आणि तिच्या अल्लू अर्जुनसोबतच्या केमिस्ट्रीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment