‘पुष्पा २’ ट्रेलर झाला प्रदर्शित; या दिवशी सगळी शो हाऊसफुल्ल होणार; तारीख लिहून घ्या!

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ सिनेमाचा ट्रेलर अखेर १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवलं आहे. २ मिनिटे ४० सेकंदांचा हा धमाकेदार ट्रेलर खिळवून ठेवणारा असून, त्यात अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि रोमँससह थ्रिलरचे मिश्रण पाहायला मिळते.

ट्रेलरमध्ये पुष्पाच्या चंदन तस्करीचा व्याप आता इंटरनॅशनल स्तरावर पोहोचल्याचं दिसत आहे. “पुष्पा नाम नहीं ब्रँड है” आणि “श्रीवल्ली मेरी बायको है, पत्नी बायको की सुने तो मुरे दुनिया को हिलाऐगा” यांसारख्या संवादांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘मै हू डॉन’ या गाण्यावर भवर सिंह (फहाद फासिल)ची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आलेली आहे.



२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’ सिनेमाने प्रेक्षकांमध्ये मोठं चांगलं रिअॅक्शन मिळवलं होतं. त्यानंतर ‘पुष्पा २’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सुरुवातीला सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता, पण विविध कारणांमुळे त्याची रिलीज डेट पुन्हा बदलली आणि आता तो ५ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमागृहांमध्ये दाखल होणार आहे.

सिनेमाच्या ट्रेलरने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, ‘पुष्पा २’ हा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे आणि या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांना धमाकेदार सिनेमा पाहायला मिळणार आहे.

1 thought on “‘पुष्पा २’ ट्रेलर झाला प्रदर्शित; या दिवशी सगळी शो हाऊसफुल्ल होणार; तारीख लिहून घ्या!”

Leave a Comment