PM Kisan 20वी हप्त्याची प्रतीक्षा वाढली, शेतकऱ्यांना कधी मिळणार पुढचा हप्ता? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan Samman Nidhi Yojana: भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे दर चार महिन्यांनी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाते. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि आधार देणे हा आहे.

19 वा हप्ता कधी आला होता?
सरकारने 19 वा हप्ता दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी केला होता. यापूर्वीचा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे 20 वा हप्ता जून 2025 मध्ये येईल अशी अपेक्षा होती. मात्र, जुलै महिन्याचा अखेर जवळ आला असतानाही पीएम किसान पोर्टल किंवा अॅपवर कोणतीही अधिकृत अपडेट मिळालेली नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

20 वा हप्ता कधी येणार?
सध्या सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनुसार पुढील काही दिवसांत अपडेट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in आणि सोशल मीडिया हँडल @pmkisanofficial यावर सतत नजर ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?
जर तुमच्या खात्यात 20 वा हप्ता अद्याप जमा झाला नसेल, तर खालील गोष्टी तपासाव्यात:

  1. pmkisan.gov.in वर लॉगिन करा.
  2. ‘पेमेंट सक्सेस’ खाली असलेल्या ‘Dashboard’ वर क्लिक करा.
  3. राज्य, जिल्हा, तालुका आणि पंचायत निवडून ‘Get Report’ वर क्लिक करा.
  4. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासा.

पीएम किसान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

  • लघु व सीमांत शेतकरी
  • ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन आहे
  • शासकीय नोकर, करदाते, व्यावसायिक यांना या योजनेचा लाभ नाही

महत्त्वाची सूचना:
सरकारने शेतकऱ्यांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक मेसेज, लिंक, कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही माहिती फक्त अधिकृत पोर्टल आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरूनच मिळवावी.

Leave a Comment