real estate tips, woman empowerment:
आजच्या काळात घर खरेदी करणे ही एक मोठी गुंतवणूक आहे. पण जर तुम्ही तुमचे नवे घर पत्नीच्या नावावर घेतले, तर तुम्हाला त्यातून अनेक आर्थिक फायदे मिळू शकतात. महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये महिलांसाठी घर खरेदीवर स्टॅम्प ड्युटी आणि इतर शुल्कांमध्ये सवलती दिल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया अशा पाच महत्त्वाच्या फायद्यांविषयी जे तुम्हाला पत्नीच्या नावावर घर घेतल्याने मिळू शकतात.
1. स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये महिला खरेदीदारांना स्टॅम्प ड्युटीवर सवलत दिली जाते. महाराष्ट्रात पुरुष खरेदीदारांना 6% स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते, तर महिलांसाठी ही दर 5% आहे. म्हणजेच घराच्या एकूण किमतीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
2. गृहकर्जाच्या व्याजदरात सवलत
पत्नीच्या नावावर कर्ज घेतल्यास, अनेक बँका आणि वित्तीय संस्था महिलांसाठी कमी व्याजदर लागू करतात. सामान्यतः 0.05% ते 0.1% पर्यंत सवलत मिळते, ज्यामुळे कर्जाची एकूण रक्कम आणि ईएमआय दोन्ही कमी होतात.
3. कर सवलतीचा लाभ
जर घर स्त्रीच्या नावावर असेल आणि ती कर्जदार देखील असेल, तर ती तिच्या उत्पन्नावरून गृहकर्जावरील व्याज आणि मूळ रक्कमेवर कर सवलत घेऊ शकते. पती-पत्नी दोघेही वेगवेगळ्या कर स्लॅबमध्ये असल्यास, एकत्रितपणे जास्त कर बचत होऊ शकते.
4. मालमत्ता वादात सुरक्षितता
पत्नीच्या नावावर मालमत्ता असल्यास, कोणत्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक वादात ती सुरक्षित राहते. विशेषतः कर्ज न भरल्यास पुरुषाच्या नावावरील मालमत्तेवर जप्तीची कारवाई होऊ शकते, पण पत्नीच्या नावावरील मालमत्ता त्यापासून सुरक्षित राहू शकते.
5. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला प्रोत्साहन
पत्नीच्या नावावर घर घेतल्यास तिच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढतो, व त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होते.