महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात – वनतारा व राज्य सरकारचा संयुक्त निर्णय


मुंबई
‘माधुरी उर्फ महादेवी’ हत्तीण आता पुन्हा नांदणी मठात परत येणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ‘वनतारा’ संस्थेनेदेखील या याचिकेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

‘वनतारा’चे वरिष्ठ अधिकारी बुधवारी मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’वर फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “महादेवी हत्तिणीचा ताबा घेण्याचा आमचा हेतू नव्हता, आम्ही फक्त न्यायालयीन आदेशांचे पालन केले.” याच वेळी कोल्हापूरकर नागरिकांच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमापत्र सुद्धा ‘वनतारा’ने प्रसिद्ध केले आहे.

पुनर्वसन केंद्र उभारण्याची घोषणा:
राज्य सरकार आणि वनतारा संस्थेच्या संयुक्त सहकार्याने नांदणी मठाजवळ वन विभागाने निवडलेल्या जागेवर महादेवीसाठी एक स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकार देणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

वनतारा संस्थेचे स्पष्टीकरण:

  • संस्था केवळ न्यायालयीन आदेशांचे पालन करत होती.
  • महादेवीच्या स्थलांतराची कोणतीही शिफारस त्यांनी केली नाही.
  • धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.
  • महादेवीला वैद्यकीय सेवा व संरक्षण देण्यात आले.
  • परतीच्या प्रवासासाठीही आवश्यक तांत्रिक मदतीचे आश्वासन दिले.

मुख्य मुद्दे:

  • महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात परतणार.
  • सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार याचिका दाखल करणार.
  • ‘वनतारा’ संस्थेनेही याचिकेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
  • महादेवीसाठी नांदणी मठाजवळ पुनर्वसन केंद्र उभारले जाणार.
  • कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन वनताराचे खेदपत्र.

भावनिक नातं:
‘महादेवी’ हत्तीण ही नांदणी जैन मठ आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेसाठी केवळ एक प्राणी नाही तर श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहे. तिचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेता राज्य सरकार आणि वनतारा दोघांनीही संवेदनशील निर्णय घेतल्याचे दिसून येते.

Leave a Comment