महाराष्ट्रातील महिला लाभार्थिनींना दर महिन्याला आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या हप्त्यासाठी तब्बल 344.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
👉 आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नसल्याने लाखो महिला प्रतिक्षेत होत्या. अखेर सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला निधी हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय 9 सप्टेंबर 2025 रोजी जारी केला आहे.
किती मिळतात पैसे?
- या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
- तर पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात.
- ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ झाला आहे.
हप्ता खात्यात कधी येणार?
सरकारकडून निधी मंजुरीनंतर महिला व बालविकास विभागाकडून लवकरच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपासणी प्रक्रियाही सुरू
महिला व बालविकास विभागाकडून माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने सुमारे 26 लाख महिलांची पात्रता तपासणी होणार आहे. या प्रक्रियेनंतर हप्त्याचे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात पाठवले जातील.
योजना का महत्त्वाची?
2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती. महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात असून ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या संख्येने महिला त्याचा लाभ घेत आहेत.
लाडक्या बहिणींना आता फक्त अधिकृत तारखेची प्रतीक्षा आहे. निधी मंजुरी झाल्यामुळे ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार हे निश्चित झाले आहे.