कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि परिसरातील जलसाठ्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, तेर्वाड, शिरोळ आणि नृसिंहवाडी या भागातील नद्यांमधील पाणीपातळी धोका रेषेच्या जवळ पोहोचली आहे.
प्रमुख पाण्याची पातळी (28 जुलै 2025 रोजी सकाळी ७ वा.):
- राजाराम बंधारा – धोक्याची पातळी: 43 फूट | सध्याची पातळी: 35.07 फूट
- रुई – धोक्याची पातळी: 70 फूट | सध्याची पातळी: 63.06 फूट
- इचलकरंजी – धोक्याची पातळी: 71 फूट | सध्याची पातळी: 59.00 फूट
- तेर्वाड – धोक्याची पातळी: 73 फूट | सध्याची पातळी: 53.00 फूट
- शिरोळ – धोक्याची पातळी: 78 फूट | सध्याची पातळी: 47.06 फूट
- नृसिंहवाडी – धोक्याची पातळी: 68 फूट | सध्याची पातळी: 46.02 फूट
या सर्व ठिकाणी नद्यांमधील पाणीपातळी सातत्याने वाढत असून प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पूरनियंत्रण यंत्रणा सतर्क ठेवली आहे. आवश्यकतेनुसार सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
WhatsApp अलर्ट सेवा सुरू
Mega News च्या डिजिटल टीमने नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप अलर्ट सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून पावसाची, पुराची व हवामानाची माहिती तात्काळ नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.
नागरिकांसाठी सूचना:
- सततच्या पावसामुळे नद्यांचा प्रवाह वेगाने वाढत आहे. नदीकिनाऱ्यांपासून दूर राहा.
- प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
NewsViewer.in वर नियमित अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.