जागतिक स्तरावर प्रसिद्ध लेखिका किरण देसाई यांची नवी कादंबरी ‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ यंदाच्या बुकर पुरस्काराच्या शर्यतीत सहभागी झाली आहे. ६६७ पानांची ही कादंबरी हमिश हॅमिल्टनने प्रकाशित केली असून, तिची निवड बुकर पुरस्काराच्या उपांत्य फेरीतील यादीत करण्यात आली आहे.
किरण देसाई यांना याआधी २००६ मध्ये ‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळाला होता. जवळपास १९ वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा या प्रतिष्ठित साहित्यिक सन्मानाच्या शर्यतीत आहेत.
बुकर प्राइझ फाउंडेशनने घोषित केलेल्या यादीत सात लेखिका आणि सहा लेखकांची एकूण १३ कादंबऱ्या आहेत. या कादंबऱ्या नऊ वेगवेगळ्या देशांतील प्रतिनिधीत्व करत असून त्यांमध्ये कथनशैलीतील विविध प्रयोग आणि विषयांवरील गहन भाष्य दिसून येते, अशी माहिती मुख्य ज्युरी राँडी डॉयल यांनी दिली.
‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ ही एक भावनिक आणि तात्विक प्रवास सांगणारी कादंबरी आहे. तिच्यामध्ये स्मृती, भाषा, ओळख, आणि कुटुंब यांसारख्या विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. सोनिया आणि सनी या दोन तरुण पात्रांचा मानसिक आणि सामाजिक प्रवास यातून उलगडतो. ही कादंबरी आधुनिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली असून ती वाचकांना अंतर्मुख करणारा अनुभव देते.
बुकरच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे, या कादंबरीतून लेखकाने भूतकाळाचे पदर आणि वर्तमानातील अस्थिरतेचे भान यशस्वीपणे पाटले आहे. त्यामुळेच तिचे नाव या वर्षाच्या द हॉलॉन्ग लाँगलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
किरण देसाई यांचा हा नवा साहित्यप्रयोग जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनला असून, भारतातील वाचकवर्गातही याची उत्सुकता वाढली आहे.