Jaguar New Logo: लक्झरी कारसाठी प्रसिद्ध असलेल्या जॅग्वार कंपनीने आपला आयकॉनिक लोगो बदलला असून, अलीकडेच नव्या लोगोचे अनावरण केले आहे. 102 वर्षांच्या इतिहासात कंपनीने केलेला हा बदल लक्षवेधी ठरत असला तरी, इंटरनेट वापरकर्त्यांनी या नवीन लोगोवर नाराजी व्यक्त केली आहे.
कंपनीने मंगळवारी नव्या लोगोबाबत घोषणा केली. हा बदल मुख्यतः 2026 पासून संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे कंपनीने वळण्याच्या तयारीचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. 3 डिसेंबर रोजी मियामी आर्ट वीकदरम्यान जॅग्वार त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार कॉन्सेप्ट सादर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नवीन लोगो हा कंपनीच्या बदलत्या ओळखीचे प्रतीक मानला जात आहे.
दरम्यान, जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी या नव्या लोगोवरुन जॅग्वारला ट्रोल केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर एलन मस्क यांनी “तुम्ही कारची विक्री करता का?” असा टोमणा मारला. यावर जॅग्वारने प्रत्युत्तर देत, “हो, आणि आम्ही तुम्हाला 2 डिसेंबरला मियामी येथे एका कप चहाबरोबर सामील होण्याचे आमंत्रण देत आहोत,” असे म्हटले.
जॅग्वारच्या नव्या लोगोने इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने कंपनीच्या प्रवासाला सुरुवात दर्शवली असली तरी, इंटरनेट वापरकर्त्यांनी हा लोगो फारसा आवडला नसल्याचे चित्र आहे. काहींनी त्यात पूर्वीच्या ओळखीचा अभाव असल्याची टीका केली आहे.
जॅग्वार त्यांच्या सीडान आणि महागड्या कार्ससाठी प्रसिद्ध असून, जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. कंपनीने आतापर्यंत अनेक मॉडेल्स बाजारात आणली आहेत. नवीन लोगो आणि इलेक्ट्रिक कारच्या घोषणेमुळे जॅग्वारने भविष्यातील लक्झरी वाहन क्षेत्रात आपले स्थान पक्के करण्याचा निर्धार केला आहे.
- विशाल आणि साई धंशिका साखरपुडेच्या आनंदात – वाढदिवशी रोमँटिक गुन्हा!
- “जपानच्या तंत्रज्ञानाची ताकद आणि भारताच्या कौशल्याची ऊर्जा: आफ्रिकेचा भविष्य घडविण्याचा मोहडा”
- हॉटेलमध्ये जेवणानंतर मोफत मिळणारी बडीशेप-खडीसाखर का दिली जाते? जाणून घ्या ५ महत्त्वाची कारणं
थायलंडचे पंतप्रधान पैतोंगथर्न शिनावात्रांना हटवण्यात—ह्यु�न सेन कॉलमुळे नैतिकतेचा प्रश्न- “मसूळ आजाराचं उपचार – हृदयाच्या आरोग्यासाठी धोक्याचा खरा उपाय?”