ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा



नवी दिल्ली : आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा 2025-26 मूल्यांकन वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी अंतिम तारीख 15 सप्टेंबर होती.

गेल्या काही दिवसांपासून आयकर ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी, सर्व्हर स्लो, टाइमआउट, आणि ग्लिचमुळे अनेक करदाते तसेच सीए यांना त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा देत विभागाने शेवटच्या क्षणी डेडलाईन वाढवली आहे.

7.3 कोटी ITR दाखल

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 15 सप्टेंबरपर्यंत 7.3 कोटी आयटीआर दाखल झाले आहेत. हे गेल्या वर्षीच्या 7.28 कोटींपेक्षा जास्त आहे. विभागाने करदाते आणि कर सल्लागारांचे आभार मानत, ज्यांनी अद्याप ITR दाखल केलेले नाही त्यांना शक्य तितक्या लवकर रिटर्न दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

मुदतवाढ का देण्यात आली?

  • आयटीआर पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी
  • मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी करदाते लॉगिन करत असल्याने सर्व्हरवर ताण
  • अनेकांना शेवटच्या क्षणी फॉर्म सबमिट करताना अडचणी

करदात्यांसाठी महत्वाचे

  • ITR फायलिंगची अंतिम तारीख आता 16 सप्टेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
  • डेडलाईन चुकल्यास दंड आणि व्याज भरावे लागू शकते.
  • करदात्यांनी शक्यतो शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता त्वरित ITR दाखल करावे.

मध्यमवर्गीय नोकरदार, व्यवसायिक तसेच इतर करदाते यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विभागाकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून त्यामुळे करदात्यांचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.



Leave a Comment