IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ फेल? पहिल्या दिवशी टीम इंडिया मानसिक लढाईत सरस!

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ पाहता टीम इंडिया इंग्लंडवर मानसिक लढाईत सरस ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. जो रुट 99 धावांवर नाबाद असला आणि बेन स्टोक्स सेट झालेला असला, तरी इंग्लंडला बॅझबॉल शैली सोडून ‘कासव छाप’ खेळ करावा लागला.

बॅझबॉलचा आत्मा हरवलेला?

इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली, जे बॅझबॉल युगात फार कमी होतं. पहिल्या दिवशी केवळ २५१ धावा करणं ही त्यांची सर्वात मंद सुरुवात ठरली आहे. बॅझबॉलचा झगमगाट बाजूला ठेवून इंग्लंडने पारंपरिक कसोटी शैलीकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळालं.

भारताच्या गोलंदाजांची कमाल

टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डीने आपल्या डेब्यू सामन्यात धमाकेदार सुरुवात करत दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केलं. त्यानंतर जडेजाने ओली पोपला ४४ धावांवर आणि बुमराहने हॅरी ब्रूकला ११ धावांवर तंबूत पाठवलं. इंग्लंडचा डाव १७२ धावांवर ४ बाद असा गडगडला होता.

रुट आणि स्टोक्सचा प्रतिकार

जो रुट आणि स्टोक्सने पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. दिवसअखेर इंग्लंडने ४ बाद २५१ धावा केल्या असून रुट ९९ आणि स्टोक्स ३९ धावांवर नाबाद आहेत.

भारताची मानसिक आघाडी

गोलंदाजांनी संयम राखत इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखलं. लॉर्ड्ससारख्या पिचवर इंग्लंडला ७० पेक्षा अधिक षटकांत फक्त २५० धावांवर रोखणं ही भारतासाठी यशस्वी रणनीती ठरली. पहिल्या दिवसाअखेर भारताने मानसिकदृष्ट्या वर्चस्व गाजवलं आहे.

क्रिकेटप्रेमींना दुसऱ्या दिवसाच्या खेळाची उत्सुकता असून रुट शतक पूर्ण करतो का आणि भारत गोलंदाजीचा सपाटा सुरु ठेवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📲 IND vs ENG सामन्याच्या अधिक अपडेटसाठी NewsViewer.in ला फॉलो करा!

Leave a Comment