गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी सुरु असलेल्या सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू क्रिकेटपटू इम्रान पटेल (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सायंकाळच्या सत्रात लकी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरु होता. लकी संघाचा कर्णधार असलेल्या इम्रान पटेल यांनी सामन्यात शानदार खेळ करत सहाव्या षटकात दोन चौकार लगावले. मात्र, षटक संपल्यानंतर गळा व हात दुखत असल्याचे सांगून मैदान सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मैदानावर कोसळले आणि…
मैदानातून बाहेर पडत असतानाच सीमारेषेजवळ इम्रान पटेल अचानक कोसळले. मैदानावरील खेळाडू व अधिकारी तत्काळ त्यांच्या मदतीला धावले. प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली आणि गर्दीतून वाट काढत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
क्रिकेट विश्वाला धक्का
इम्रान पटेल हे उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांनी गेल्यावर्षी एपीएल स्पर्धेत ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडविरुद्ध नाबाद ५२ धावांची खेळी साकारत आपली छाप सोडली होती. त्यांच्या कामगिरीने शक्ती स्ट्रायकर्स संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
इम्रान पटेल यांचा दफनविधी आझाद कॉलेज पॅसिफिक हॉस्पिटलजवळील कब्रस्तानमध्ये पार पडला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि भावंडे असा परिवार आहे.
जी. श्रीकांत यांनी, “शेख हबीबनंतर मैदानावरच खेळाडू जाण्याची ही दुसरी घटना असून, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे,” असे सांगून दुःख व्यक्त केले.
क्रिकेट मैदानावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड