अलीकडेच दुआ लिपा मुंबईत झालेल्या तिच्या कॉन्सर्टमध्ये भारतीय चाहत्यांना चांगलाच रंगवून गेली. ‘वो लडकी जो’ आणि ‘लेविटेटिंग’ या गाण्यांचा मॅशअप सादर करत, दुआने भारतीय गाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं. शाहरुख खानवर चित्रित केलेल्या ‘वो लडकी जो’ गाण्याचा परफॉर्मन्स विशेष आकर्षणाचा विषय ठरला, ज्यामुळे तिचे चाहते खूश होते आणि व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान चर्चेचा सूर लावला.
पण याच गाण्याच्या मूळ गायक आणि संगीतकार अभिजीत भट्टाचार्य आणि अनु मलिक यांनी गाण्याचे श्रेय न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा जय भट्टाचार्य यांनी आपल्या वडिलांचा नाराजीत पोष्ट शेअर केली, ज्यात गाण्याच्या गायकाला त्याचे श्रेय न दिल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
अभिजीत भट्टाचार्य यांनीही या संदर्भात तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “समस्या ही आहे की याबद्दल कोणी बोलत नाही. हे दुर्दैव आहे की आपण अशा देशात राहतो जिथे एकाही न्यूज साइट किंवा इंस्टाग्राम पेजवर या गाण्याच्या गायकाबद्दल बोलले गेले नाही.”
तसेच, अभिजीत भट्टाचार्य यांनी गाण्याचा मूळ श्रेय अनु मलिक आणि स्वतःला दिले. “हे गाणे ‘वो लड़की जो सबसे अलग है’ आहे, आणि त्याचे श्रेय आमच्याच कडे आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.
या मुद्द्यावर अनु मलिक यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दुआ लीपाच्या कॉन्सर्टमध्ये गाण्याची चर्चा व्हावी, हे मला आनंद आहे. त्या गाण्याच्या लोकप्रियतेमुळेच अजून चर्चा होत आहे.”
दुआ लिपाच्या या मॅशअपवर या वादामुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. गाण्याच्या श्रेयविषयक मुद्द्यावर चर्चा तीव्र होत असताना, दुआ लिपा आणि भारतीय संगीतकार यांच्यातील मतभेद लक्षवेधी ठरले आहेत.
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड