जसप्रीत बुमराहचा लॉर्ड्सवर ‘पंजा’; कपिल देव यांचा विक्रम मोडत दिलं शांत सेलिब्रेशनचं कारण

India vs England 3rd Test 2025 Bumrah Celebration Reason:


जसप्रीत बुमराहचा लॉर्ड्सवर ‘पंजा’; कपिल देव यांचा विक्रम मोडत दिलं शांत सेलिब्रेशनचं कारण

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत लॉर्ड्सच्या मैदानावर जोरदार पुनरागमन करत भेदक गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 5 बळी घेत इंग्लंडची फलंदाजी कोलमडवली. विशेष म्हणजे, लॉर्ड्सवर एका डावात पाच विकेट्स घेण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता आणि त्यामुळे त्याचे नाव Honours Board वर कोरले गेले आहे.

कपिल देव यांचा विक्रम मोडला

या सामन्यात बुमराहने जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांना माघारी पाठवले. या कामगिरीनंतर त्याने माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रमही मागे टाकला आहे. लॉर्ड्सवर पाच विकेट्स घेणाऱ्या बुमराहने आता इंग्लंडविरुद्ध परदेशात सर्वाधिक वेळा “पंजा” घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत वरचं स्थान पटकावलं आहे.

सेलिब्रेशन का केलं नाही?

विकेट घेतल्यानंतर बुमराह फारसा आनंद व्यक्त करताना दिसला नाही, यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. याबद्दल स्पष्टीकरण देताना बुमराहने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर सांगितलं,

“मी थकलो होतो म्हणून फारसे सेलिब्रेशन केले नाही. मी आता 21-22 वर्षांचा नाही आहे की, विकेट घेतल्यावर उड्या मारत राहीन. मला फक्त माझ्या मार्कवर परत जाऊन पुन्हा गोलंदाजी करायची होती.”

जोरदार पुनरागमन

दुसऱ्या कसोटीत विश्रांतीनंतर बुमराहने तिसऱ्या कसोटीत जबरदस्त पुनरागमन केलं आहे. पहिल्या कसोटीतसुद्धा त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. लॉर्ड्सवर मिळालेल्या 5 बळ्यांनी त्याने या मालिकेतली दुसरी “फायव्हर” साकारली आहे. इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपण्यामागे बुमराहचा मोठा वाटा होता.

उर्वरित मालिका

या मालिकेसाठी बुमराह फक्त 3 कसोटी सामने खेळणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे आगामी मॅंचेस्टर आणि ओव्हल कसोटीत तो कोणत्या सामन्यात खेळणार, हे अद्याप ठरलेलं नाही. (Honours Board Lords Bumrah)

इतर भारतीय गोलंदाजांची कामगिरी

बुमराह व्यतिरिक्त सिराज आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजाला केवळ 1 यश मिळालं.

Leave a Comment