भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! bhaubeej wishes in marathi

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा: दिवाळीच्या पाचव्या दिवशी साजरा होणारा भाऊबीज म्हणजेच बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा आनंदाचा उत्सव. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावते, त्याचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. हा सण एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाचा, निखळ विश्वासाचा, आणि कायमच खंबीर राहणाऱ्या सोबतीचे प्रतीक आहे.

भाऊबीजेच्या शुभेच्छा संदेश:

 

1. सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा

निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा,

भाऊबीजनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

 

2. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला

भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

 

3. तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,

तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.

दादा, तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!

 

4. बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया.

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात…

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

5. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे

मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.

मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

6. कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ-बहिणीचं हे नातं खूप गोड आहे!

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

7. पाण्याच्या ग्लासावरून भांडणाऱ्या,

पिझ्झाच्या शेवटच्या घासावरून चिडवणाऱ्या

आणि तरीही एकमेकांसाठी पैसे साठवून

गिफ्ट आणणाऱ्या प्रत्येक गोड भावंडाला

भाऊबीजेच्या शुभेच्छा!

 

8. दिवाळीचे हे दिवे लखलखते,

उजळून टाकू हे बंध प्रेमाचे.

चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

भाऊबीज हा फक्त सण नाही, तर बहीण-भावाच्या नात्यातील अतूट विश्वास, प्रेम आणि सदैव एकमेकांच्या पाठीशी असण्याचे वचन आहे. या पवित्र दिवशी आपले बहीण-भावाचे नाते आणखी मजबूत

बनवा आणि शुभेच्छा पाठवून या सणाचा आनंद द्विगुणीत करा!

 

Leave a Comment