हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अवतार 3: फायर अँड अॅश’ चा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये भव्य दृश्य प्रभावांसोबतच एक नवा खलनायक समोर येत असून, पँडोराच्या शांततेवर मोठे संकट घोंगावत आहे, हे स्पष्ट होते.
नवीन खलनायक ‘अॅश पीपल’ ची ओळख
या भागात ‘अॅश पीपल’ नावाच्या नव्या जमातीची ओळख होते, जी आग आणि ज्वालामुखीशी संबंधित आहे. ही जमात जेक सुलीच्या कुटुंबाच्या विरोधात असल्याचे दिसते. त्यांच्या नेतृत्वाखालील एक शक्तिशाली खलनायक या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ट्रेलरमध्ये याची झलक मिळते आणि त्यामुळे चित्रपटात प्रचंड थरार असणार, हे निश्चित आहे.
जेक सुली आणि नेतीरी पुन्हा संकटात
ट्रेलरमध्ये जेक सुली, नेतीरी आणि त्यांचे कुटुंब एका मोठ्या धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज होत असल्याचे दाखवले आहे. भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भावनिक क्षणांनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या उंच अपेक्षा पूर्ण करत आहे.
१९ डिसेंबर रोजी भारतात बहुभाषिक रिलीज
भारतात हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी यावेळी भारतात मोठ्या प्रमाणावर प्रमोशन आणि रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘द वे ऑफ वॉटर’नंतरची पुढची थरारक गोष्ट
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ च्या यशानंतर, ‘फायर अँड अॅश’ हा चित्रपट कथा पुढे नेतो आणि पँडोराच्या विश्वात एक नवीन, आगीसारखी भीती निर्माण करतो. ट्रेलरने आधीच जगभरातील चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.