एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार? रिझर्व्ह बँकेचा खुलासा


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने यावर स्पष्ट भूमिका घेत अफवांना पूर्णविराम दिला आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढण्यावर कोणतीही बंदी येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरबीआयच्या मते, बँकांनी २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये वापरणे सुरूच ठेवावे. यासाठी कोणताही आदेश किंवा बदल करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारकडूनही यासंदर्भात कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

ही माहिती आरबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या एका याचिकेच्या उत्तरादरम्यान दिली आहे. याचिकेत एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र यावर आरबीआयने स्पष्ट केला की, कोणताही निर्णय झाला नसून, सर्वसामान्य नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

दरम्यान, RBI ने नागरीकांना विनंती केली आहे की, त्यांनी फक्त अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवावा व सोशल मीडियावर पसरत असलेल्या भ्रामक माहितीपासून सावध रहावे.

Leave a Comment