भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात एथर एनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय 450 सीरिजमध्ये नवे फीचर्स, बॅटरी पर्याय आणि विशेष एडिशन्ससह ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
सध्या एथरच्या 450 सीरिजमध्ये तीन प्रमुख मॉडेल्स उपलब्ध आहेत — Ather 450s, Ather 450X आणि Ather 450 Apex.
450X – दोन बॅटरी पर्याय
450X मॉडेलमध्ये 2.9 kWh आणि 3.7 kWh असे दोन बॅटरी पर्याय आहेत.
- 2.9 kWh व्हेरिएंट: किंमत ₹1.50 लाख (एक्स-शोरूम), रेंज 126 किमी, टॉप स्पीड 90 किमी/तास, 0-40 किमी/तास वेग फक्त 3.3 सेकंदांत. Atherstack Pro सोबत लोकेशन शेअरिंग व 5 वर्ष/50,000 किमी बॅटरी वॉरंटी मिळते.
- 3.7 kWh व्हेरिएंट: किंमत ₹1.60 लाख (एक्स-शोरूम), रेंज 161 किमी, टॉप स्पीड 90 किमी/तास. Atherstack Pro मध्ये 7-इंच टचस्क्रीन, मॅजिक ट्विस्ट, चोरी अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये.
450 Apex – लिमिटेड एडिशन
450 Apex हे कंपनीचे मर्यादित आवृत्तीचे मॉडेल असून ते फक्त 3.7 kWh बॅटरीसह उपलब्ध आहे.
- किंमत ₹1.84 लाख (एक्स-शोरूम)
- रेंज 157 किमी
- टॉप स्पीड 100 किमी/तास
- 0-40 किमी/तास वेग फक्त 2.90 सेकंदांत
450s – बेस मॉडेल
450s मॉडेलमध्येही दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत:
- 2.9 kWh: किंमत ₹1.23 लाख, रेंज 122 किमी
- 3.7 kWh: किंमत ₹1.43 लाख, रेंज 161 किमी
दोन्ही व्हेरिएंट्सचा टॉप स्पीड 90 किमी/तास असून, 0-40 किमी/तास वेग 3.9 सेकंदांत मिळतो. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी अतिरिक्त ₹15,000 भरावे लागतात.
क्रूज कंट्रोल फीचरची एन्ट्री
मिडिया रिपोर्टनुसार, एथर एनर्जी आपल्या 450X आणि 450 Apex मॉडेल्समध्ये क्रूज कंट्रोल फीचर आणण्याची तयारी करत आहे. हे अपडेट फक्त Atherstack Pro सॉफ्टवेअर असलेल्या गाड्यांसाठी उपलब्ध असू शकते. 30 ऑगस्टला होणाऱ्या कम्युनिटी डे कार्यक्रमात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याच दिवशी कंपनी एक एन्ट्री-लेव्हल मॉडेलसुद्धा लाँच करू शकते.
क्रूज कंट्रोल फीचर भारतीय इलेक्ट्रिक स्कूटरसाठी पूर्णपणे नवे नसले तरी, एथरकडून ते दिल्यामुळे वापरकर्त्यांच्या रायडिंग अनुभवात सुधारणा होणार आहे.
एथरच्या या नव्या तयारीमुळे भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात पुन्हा एकदा स्पर्धा तापण्याची शक्यता आहे.