जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अलीकडील एका मुलाखतीत त्यांच्या गायन कारकिर्दीतील काही महत्वाच्या आणि वादग्रस्त क्षणांची आठवण करून दिली. ‘पंचम दा’ अर्थात संगीतकार आर.डी. बर्मन यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर करताना त्यांनी सांगितले की, एकदा त्या स्वतःच्या गाण्यांमुळे पतीवर चिडल्या होत्या.
आशा भोसले म्हणाल्या, “मी एकदा पंचम दांना विचारलं, की मला नेहमी बोल्ड आणि सेन्शुअल गाणीच का दिली जातात? लता दीदींना मात्र नेहमी संस्कारी आणि सन्मानजनक गाणी मिळतात.” या प्रश्नावर आर.डी. बर्मन यांनी उत्तर दिलं की, “हे गाणं फक्त तूच गाऊ शकतेस आणि ते लोकांच्या मनावर राज्य करेल.”
1971 साली आलेलं ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण ठरलं. आशा भोसले सांगतात की, “या गाण्याचं संगीत भारी आहे हे मला समजलं होतं, पण ते इतकं मोठं हिट होईल, याचा अंदाज नव्हता.”
त्याचबरोबर प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्याशी संबंधित एक किस्साही त्यांनी शेअर केला. “मजरूह स्टुडिओबाहेर गेले आणि म्हणाले, ‘बेटी, मी गंदा गाणं लिहिलं आहे. माझ्या मुली मोठ्या होतील आणि हे गाणं ऐकतील.’ त्यांना झिझक होती, पण त्यांनी त्यांच्या व्यावसायिक बांधिलकीमुळे ते गाणं लिहिलं.”
याच काळात आशा भोसले यांची 3-4 गाणी बॉम्बे रेडिओवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, या सर्व वादांवर मात करत त्यांनी आपलं संगीत साम्राज्य उभं केलं.
ही मुलाखत आशा भोसले यांनी ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीला दिली असून, त्यात त्यांनी त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा केलेला हा उलगडा रसिकांना भावून गेला आहे.