बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनी एकत्र ‘हीरोइन’, ‘सत्याग्रह’, ‘रावण’ आणि ‘वी आर फॅमिली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरोइन’ या चित्रपटातील इंटीमेट सीनसाठी दोघांची केमिस्ट्री खूप चर्चेत आली होती.
सध्या अर्जुन रामपालचा एक जुना इंटरव्ह्यू पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अर्जुनने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरसोबत केलेल्या इंटीमेट सीनबद्दल व्यक्त केलेलं मत चर्चेत आलं आहे.
या इंटरव्ह्यूत अर्जुन म्हणतो, “माझं बेबोसोबत कोझी होणं मला खूप आवडलं. मी अजूनही त्या लव्ह मेकिंग सीनचे क्षण आठवतो.” त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
रेडिटवर एका यूजरने लिहिले, “हे विधान खूपच अजब आणि अनप्रोफेशनल वाटतं.” तर दुसऱ्याने म्हटलं, “काही लोक असे स्टेटमेंट्स देण्यात इतके कम्फर्टेबल असतात हे माहित नव्हतं.” काहीजणांनी तर याला त्या काळातील ‘प्रमोशनल टॅक्टिक’ असंही म्हटलं आहे, जेणेकरून लोक सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहतील.
‘हीरोइन’ चित्रपटाची पार्श्वभूमी:
‘हीरोइन’ हा मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. करीना कपूरने एक नामांकित अभिनेत्रीच्या भूमिकेत दमदार अभिनय केला होता. अर्जुन रामपालसोबतच्या तिच्या सीनमुळे तो चर्चेत राहिला. यामध्ये रणदीप हुड्डा, मुग्धा गोडसे आणि दिव्या दत्ताही प्रमुख भूमिकेत होत्या.
करीना कपूरने अलीकडेच बॉलिवूडमध्ये आपले २५ वर्ष पूर्ण केले आहेत. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये तिने फार थोडे इंटीमेट सीन दिले आहेत. त्यामुळे अर्जुनचं हे विधान चाहत्यांसाठी धक्कादायक ठरत आहे.
अर्जुन रामपालच्या आगामी चित्रपटांची झलक:
अर्जुनची शेवटची फिल्म ‘क्रॅक’ २०२४ मध्ये प्रदर्शित झाली होती. आता तो ‘निकिता रॉय’ आणि ‘धुरंधर’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘निकिता रॉय’ मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत, तर ‘धुरंधर’ मध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्यासोबत अर्जुन देखील झळकणार आहे.