झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग रोज नवनवीन ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांसमोर येते. ४ सप्टेंबर २०२५ च्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त कॉमेडी आणि कौटुंबिक नाट्य पाहायला मिळाले. सासु-सुनेची गट्टी जमल्यामुळे अर्जुनच्या नाकी नऊ आलेले असतात.
अर्जुनला धडा शिकवण्यासाठी सासु-सुना एकत्र
एपिसोडच्या सुरुवातीला सायली आणि कल्पना अर्जुनला दुर्लक्षित करण्याचा प्लॅन करतात. जेवणात उकडीचे मोदक खाऊन त्याच्यासाठी काहीही न ठेवल्याचा बहाणा करून त्याला छळतात. वैतागलेला अर्जुन बाहेरून जेवण ऑर्डर करण्याची धमकी देतो. मात्र दोघींच्या एकत्रित दटावणीमुळे त्याचा पिच्छा पुरतो. शेवटी अर्जुन दोघींच्या पाया पडतो तेव्हा कुठे त्याला जेवण मिळतं.
कल्पनेचा बदललेला मूड – ‘सायली डे’
यानंतर कल्पना अर्जुनकडे येते आणि सांगते की तिने नकळत सायलीसोबत वाईट वागणूक दिली, पण आता ती हे सगळं सुधारू इच्छिते. यासाठी ती खास ‘सायली डे’ साजरा करण्याचा निर्णय घेते. कल्पना अर्जुनला सायलीच्या आवडीनिवडींची यादी तयार करण्यास सांगते.
अर्जुनची पंचायत
पण खरी अडचण अशी की, अर्जुनलाच आपल्या पत्नीच्या आवडीनिवडी माहित नसतात. तो कुसुमकडे मदतीसाठी फोन करतो, पण कुसुम नकार देते आणि स्वतः शोधून काढण्याचा सल्ला देते. त्यामुळे अर्जुन सायलीची डायरी वाचायला घेतो. मात्र त्यात त्याला सायलीच्या नव्हे तर स्वतःबद्दलच लिहिलेलं आढळतं.
‘कपल गेम’मधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न
दरम्यान, सुभेदार कुटुंब एकत्र येऊन गेम खेळायचं ठरवतात. अर्जुन या संधीचा फायदा घेत कपल गेम खेळण्याचा प्रस्ताव ठेवतो. त्याच्या मनात फक्त एकच हेतू असतो – गेमच्या माध्यमातून सायलीच्या आवडीनिवडी जाणून घेणे आणि आई कल्पनाने दिलेला टास्क पूर्ण करणे.
आगामी भागात या गेमदरम्यान अर्जुनला सायलीबद्दल काय काय कळतं आणि ‘सायली डे’ कसा साजरा होतो, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.