सांगलीत पूरस्थितीचा अलर्ट: यलो, ऑरेंज व रेड झोनमधील भागांची यादी जाहीर


सांगली : कृष्णा नदीची पातळी वाढत असल्याने सांगली शहरात पूरस्थितीचा धोका वाढला आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील विविध भागांना यलो झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली आहे. नदीची पातळी वाढताच या भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यलो झोन (30.0 ft ते 40.0 ft पाणी पातळी)

या पातळीवर खालील भाग बाधित होऊ शकतात :

  • सुर्यवंशी प्लॉट
  • इनामदार प्लॉट (शिवनगर)
  • कर्नाळ रोड परिसर
  • शिवमंदिर परिसर, बायपास चौक
  • काकानगर समोरील घरे
  • दत्तनगर परिसर
  • मगरमच्छ कॉलनी 1 व 2

ऑरेंज झोन (42.5 ft ते 49.6 ft पाणी पातळी)

या झोनमध्ये पाणी शिरल्यास खालील ठिकाणे प्रभावित होण्याची शक्यता :

  • मगरमच्छ कॉलनी 3, 4 व 5
  • सिद्धार्थ परिसर, राजीव गांधी नगर
  • भारतनगर पाटणे प्लॉट, हरीपूर रोड
  • हरिपूर रोड क्रॉस, मारुती चौक
  • व्यंकटेशनगर मागील भाग, आमराई, रामनगर
  • टिळक चौक ते मारुती रोड, आनंद थिएटर, अमरधाम समोरील रस्ता
  • कोल्हापूर रोड क्रॉस, शिवाजी मंडई, बापट बाल रस्ता
  • मंगेश चौक, सांगलीवाडी, शामरावनगर, खिलारे प्लॉट, विठ्ठलनगर, लड्डे सोसायटी
  • पद्मा टॉकीज वखार भाग, मॉडर्न कॉलनी

रेड झोन (50.0 ft पेक्षा जास्त पाणी पातळी)

सर्वाधिक धोकादायक पातळीवर बाधित होणारे भाग :

  • गुजराती हायस्कूल परिसर, धोबीघाट, ईदगाह रस्ता
  • रिसाला रोड पोलिस लाईन पश्चिम बाजू
  • गोकुळनगर, संजय गांधी झोपडपट्टी, भीमनगर
  • जुना बुधगाव रस्ता, रत्नाकर हौसिंग सोसायटी
  • गणेशनगर, अरिहंत कॉलनी, गणेश कॉलनी
  • पाकीजा मस्जिद पिछाडीस, घाडगे शोरूम परिसर, झुलेलाल चौक
  • कृष्णा हॉस्पीटल, शाहू उद्यान, बागडी गल्ली
  • कॉलेज कॉर्नर परिसर

नागरिकांसाठी सूचना

  • यलो व ऑरेंज झोनमधील रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
  • रेड झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
  • पूरस्थिती वाढल्यास मदत कार्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

कृष्णा नदीची पातळी वाढत असल्यामुळे सांगलीतील नागरिकांनी सतर्क राहणे आणि प्रशासनाशी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.

Leave a Comment