‘टेट’ परीक्षेचा आज निकाल; शिक्षक भरतीसाठी 10,779 उमेदवारांना मिळणार कौल


मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TET – Teacher Aptitude and Intelligence Test) परीक्षेचा निकाल आज, सोमवारी जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा २७ ते ३० मे आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती.

या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ अर्ज मान्य करण्यात आले होते. मात्र, अखेरीस बीएड (B.Ed) आणि डीएलएड (D.El.Ed) या दोन्ही गटांतून एकत्रित १० हजार ७७९ उमेदवार अॅपिअर झाले.

राज्य परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार, बीएडच्या ९,९५२ आणि डीएलएडच्या ८२७ उमेदवारांनी परीक्षा दिली. तथापि, ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हतेची (B.Ed/D.El.Ed) आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत सादर केली नाहीत, अशा ६,३१९ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

निकाल पाहण्यासाठी लिंक
उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे:
👉 https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx

शिक्षक भरती प्रक्रियेत टेटचे महत्त्व
‘टेट’ परीक्षा ही शिक्षकांच्या मूलभूत क्षमतांचे मूल्यांकन करणारी महत्त्वाची पायरी आहे. यामध्ये आकलनशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता, शिकवण्याची पद्धत व अध्यापनातील दृष्टिकोन तपासला जातो. या परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवारच पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरतात. पुढील टप्प्यात त्यांना मुलाखत किंवा प्रत्यक्ष अध्यापन चाचणीसाठी बोलावले जाते.

राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आजचा निकाल हजारो उमेदवारांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

Leave a Comment