आयुष शेट्टीची चमकदार कामगिरी! मकाऊ ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली


जागतिक क्रमवारीत 31व्या स्थानावर असलेल्या शेट्टीने 66व्या क्रमांकाच्या हुआंग यू कायवर केवळ 31 मिनिटांत 21-10, 21-11 असा विजय मिळवून आपले स्थान निश्चित केले.

दरम्यान, भारताच्या मिश्र दुहेरी प्रकारातही चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या पाचव्या मानांकनाच्या जोडीने थायलंडच्या रेचापोल मक्करासिथॉर्न आणि नटामॉन लायसुवान यांच्यावर 21-10, 21-15 असा सहज विजय मिळवला. हा सामना केवळ 26 मिनिटांत जिंकून त्यांनी आपल्या विजयी दौडीला गती दिली.

मात्र, दिवसाचा एक निराशाजनक भाग म्हणजे पुरुष एकेरीतील सतीश कुमार करुणाकरन याचा पराभव. त्याला मलेशियाच्या जस्टिन होहकडून 19-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीतील रोहन कूपर आणि रुत्विका शिवानी गडे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या वू गुझान झुन आणि ली चिया सीन या जोडीने त्यांना 20-22, 17-21 अशा सेट्समध्ये पराभूत केले.



Leave a Comment