मुंबई लोकल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; दैनंदिन प्रवासातल्या भावना आणि अनुभवांची कहाणी

ठाणे:
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन फक्त प्रवासाचे साधन नसून, ती हजारो प्रवाशांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. या दैनंदिन प्रवासातून घडणाऱ्या भावनिक, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांचा पट मांडणारा ‘मुंबई लोकल’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर ठाण्यात एका विशेष कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केले आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्मॅशलोडेड प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी प्रथमच एकत्र झळकणार आहे. त्यांच्यासोबत मनोरंजनाची मेजवानी देणारे कलाकार म्हणजे मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनेकते कांबळे, संजय खापरे, संजय कुलकर्णी आणि सिम्ता डोंगरे हे असून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटात केवळ ट्रेनमधला प्रवासच नव्हे, तर त्या प्रवासात जुळणाऱ्या नात्यांचा, संघर्षांचा आणि स्वप्नांचा चित्रपट आहे. आयुष्यातील चढउतार, आशा-निराशा, संघर्ष आणि प्रेम या सर्व भावना ‘मुंबई लोकल’मधून अत्यंत प्रभावीपणे सादर होणार आहेत.

हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment