महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत असले तरी आता या रकमेत वाढ करून २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळणार ९००० रुपये
आतापर्यंत या योजनेअंतर्गत ५ हप्ते जमा झाले आहेत. मात्र, ज्या महिलांना सुरुवातीला पैसे मिळाले नव्हते त्यांना सहा महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच तब्बल ९००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या आधी अर्ज केलेल्या आणि आधार किंवा बँक खाते लिंक नसलेल्या महिलांना ही रक्कम दिली जाईल.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होईल. मिडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी आता या रकमेची प्रतीक्षा करत आहेत. डिसेंबर महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने हा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे.
२१०० रुपये कधीपासून मिळणार?
महिलांना दरमहा २१०० रुपये कधीपासून मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मार्चपासून २१०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना
ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले नाही, त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे.
फॉर्म भरलेले महिलांनी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासावी.
महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. योजनेतील हप्ते नियमितपणे जमा होण्याने महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होईल.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!