भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेकदा ऐनवेळी प्रवास ठरल्याने तिकीट मिळणे कठीण होते. तत्काळ तिकीट बुकिंगही काही मिनिटांत संपते, अशावेळी प्रवाशांना करंट तिकीट बुकिंग हा उत्तम पर्याय ठरतो. करंट तिकीट प्रणालीतून ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी उपलब्ध जागा बुक करता येतात.
करंट तिकीट म्हणजे काय?
रेल्वे स्थानकातून किंवा IRCTC च्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरून चार्ट तयार झाल्यानंतर उपलब्ध जागांसाठी करंट तिकीट बुक करता येते. यामुळे प्रवाशांना निश्चित जागा मिळते आणि रेल्वेच्या महसुलातही वाढ होते.
करंट तिकीट कसे बुक करावे?
तुम्ही IRCTC ॲप किंवा वेबसाईटवरून सहज करंट तिकीट बुक करू शकता. खालील स्टेप्स फॉलो करा:
1. IRCTC वर लॉगिन करा.
2. ‘Chart Vacancy’ सेक्शनवर क्लिक करा.
3. ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि स्टेशनचे नाव भरा.
4. तुमच्या इच्छित क्लासची उपलब्धता तपासा.
हेही वाचा –
5. रिकामी जागा असल्यास ट्रेन टीटीईशी (चल तिकीट परीक्षक) संपर्क साधा.
6. आवश्यक भाडे भरून तिकीट बुक करा.
करंट तिकीटाचे फायदे
सुलभता: करंट तिकीटासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
वाजवी दर: हे तिकीट नेहमीच्या दरात मिळते.
सुरक्षित प्रवास: प्रवाशांना निश्चित सीटची हमी मिळते.
करंट तिकीटासाठी काही विशेष सूचना:
करंट तिकीट ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी बुक करता येते.
हे तिकीट स्थानकावरील काऊंटरवर जाऊनही तयार करता येते.
तत्काळ तिकीटाच्या तुलनेत करंट तिकीट अधिक किफायतशीर आहे.
करंट तिकीट प्रणालीमुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुकर आणि आनंददायी झाला आहे.
- एमपीएससी मुख्य परीक्षा २०२३ : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अभ्यास कसा करावा?
- उद्योगांच्या सर्व परवान्यांसाठी आता ‘मैत्री पोर्टल’ एकच प्रवेशद्वार: मुख्यमंत्री फडणवीस
- महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण, दोन वर्षांत काम पूर्ण
- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित
- वैद्यकीय महाविद्यालयांतील EWS आरक्षण रद्द