मुळशी तालुक्यातील माणगावचे सुपुत्र आणि कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणारे विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) यांचे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ४ डिसेंबर) हिंजवडी येथे घडली. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने मुळशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
कुस्ती क्षेत्रातील तेजस्वी करिअर
विक्रम पारखी यांनी २०१४ साली “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा” जिंकून कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर झारखंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवले होते. तसेच मुळशीतल्या प्रतिष्ठित माले केसरी स्पर्धेचा किताबही त्यांनी जिंकला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
लग्नाच्या तयारीत दुर्दैवी घटना
१२ डिसेंबर रोजी विक्रम पारखी यांचा विवाह ठरला होता, आणि कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुस्ती क्षेत्रातील नावलौकिक
हेही वाचा –
विक्रम पारखी हे हिंदकेसरी अमोल बुचडे यांचे शिष्य होते. त्यांच्या कष्टाने आणि समर्पणाने त्यांनी मुळशी तालुका आणि माणगाव गावाचे नाव उंचावले. त्यांच्या वडिलांनीही कारगिल युद्धात देशसेवा केली होती.
पोलीस तपास सुरू
हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी सांगितले की, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.
कुटुंब आणि चाहत्यांना धक्का
विक्रम यांच्या पश्चात आई, वडील, विवाहित भाऊ, आणि एक बहिण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुस्ती क्षेत्रासह संपूर्ण मुळशी तालुका शोकसागरात बुडाला आहे.
टॅग्स: #VikramParkhi #KumarMaharashtraKesari #GymHeartAttack #Mulshi #IndianWrestling
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!