आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अंतिम आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज झालेल्या बैठकीत त्यांनी यंत्रणांच्या समन्वयाने आणि सूक्ष्म नियोजनावर जोर दिला.
बैठकीला नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्रंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा असेल, ज्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतील. त्यामुळे सर्व यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा आहे. यासाठी, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात बैठक होईल, ज्यात प्रत्येक यंत्रणेने केलेल्या कार्यांची समीक्षा केली जाईल.
बैठकीत नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी आराखड्यात सुधारणा व आवश्यक बाबींच्या सूचनाही दिल्या. यासंबंधी साधू महंत, आखाडा प्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन लवकरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!