सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका उंच टॉवरवर काम करणाऱ्या कामगारांनी चक्क रिल्स बनवण्याचा धाडसी प्रकार केला आहे. “maisuddin.786” या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट झालेल्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडिओची माहिती
व्हायरल व्हिडिओत उंच टॉवरवर काम करणारे काही कामगार दिसत आहेत. मात्र, काम करताना त्यांनी स्वतःची सुरक्षा धाब्यावर बसवून मोबाईलने रिल्स तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओत हे तरुण अतिशय बिनधास्तपणे काम करताना आणि त्याच वेळी रिल्स बनवताना दिसतात.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सहा दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला असून, त्याला ८३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या धोकादायक व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, “काळजी घ्या भाऊ, तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी पाहणार आहात.” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, “हे खूप खतरनाक आहे.” अशा अनेक कमेंट्समधून लोकांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाची टीप
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी त्याची पडताळणी झालेली नाही. आम्ही वाचक-प्रेक्षकांना फक्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकाराचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
कामगारांनी केलेला हा प्रकार मनोरंजनासाठी असला तरी जीविताला धोका होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
- Dashavatar Box Office: ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘वेड’चा रेकॉर्ड मोडणार का दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट?
- चंदन आणि बेसनचा फेस मास्क: टॅनिंग घालवून चेहऱ्याला देईल नैसर्गिक ग्लो
- ITR Filing 2025: आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली, करदात्यांना मोठा दिलासा
- पुरण न वाटता बनवा टम्म, गुबगुबीत आणि मऊसर पुरणपोळी – नवशिक्यांसाठी सोप्या टिप्स
- चहाला साखरेऐवजी घाला हे 5 नैसर्गिक पदार्थ, चहा बनेल हेल्दी व नैसर्गिक गोड